गोवा सिटीलाईन न्यूज नेटवर्क गोव्याचे मुख्यमंत्री.नामदार.प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू व सेवा कर आणि महसूल उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी मंत्री गटाची पहिली बैठक महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे पार पडली.या बैठकीत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री.नामदार कु आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले.
यावेळी कर प्रणालीबाबत केंद्र शासन व राज्य शासनांमध्ये उत्तम समन्वय साधण्यासाठी एक सामाईक व्यासपीठ निर्माण करण्याची भूमिका मंत्री आदिती तटकरे यांनी राज्याच्या वतीने मांडली.
जीएसटी आणि महसूल उत्पन्नावर आधारित मंत्री गटाची ही पहिलीच बैठक होती.या बैठकीत राज्यनिहाय महसूल प्रवृत्ती, आर्थिक घटकांचा प्रभाव, कर चोरी विरोधी उपाय आणि धोरणात्मक शिफारशींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
