नाशिक दिनकर गायकवाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या यशवंत मंहई इमारतीवर लवकरच हातोडा पडणार आहे.बांधकाम विभागाने काही दिवसांपूर्वी ही इमारत जमीनदोस्त करण्यासाठी निविदा राबविली होती.अखेर याप्रकरणी कार्यवाही होणार असल्याने बहुमजली पार्किंगचा मार्ग मोकळा झाला आहे.
मध्यवर्ती भागातील बाजारपेठ असणाऱ्या रविवार कारंजा जवळील मोडकळीस आलेल्या मंडईस लवकरच सुरुवात होत आहे.या कामाचा कार्यारंभ आदेश महापालिकेने नुकताच काढला असून मंडईच्या जागेवर दुमजली वाहनतळ उभारण्याच्या दिशेने खऱ्या अथनि वाट्यात सुरू होत आहे. या वाहनतळामुळे रविवार पेठ, सराफ बाजार, कापड बाजार, मेनरोड परिसरातील व्यापारी व ग्राहकांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा प्रश्न सुटणार आहे
रविवार कारंजा परिसरातील नगरसेविका स्व. सुरेखा भोसले यांनी मोडकळीस आलेल्या या जागेवर बहुमजली वाहनतळ उभारणीचे स्वप्न बघितले व त्यादृष्टीने वाटचाल सुरू केली. परंतु तू त्यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर हा प्रश्न गाळण्याची भिती होती होती. परंतू त्यांचे सुपुत्र व शिवसेनेचे पदाधिकारी सचिन भोसले व सुन रश्मी भोसले यांनी याबाबत पालिकेकडे पाठपुरावा सुरूच ठेवला होता. या
प्रयत्नांना आता मूर्त स्वरूप देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रविवार कारंजा परिसरात बहुमजली पार्किंग झाल्यास वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न मिटणार आहे. ही इमारत घोकादायक झाल्याने स्ट्रक्चर ऑडिट केले असता तो कधीही होण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार गतिमानतेने या प्रकरणी तत्कालीन उपयुक्त श्रीकांत पवार यांनी कार्यवाही केली होती.
