वरवंडी संपत भोसले संगमनेर तालुक्याचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांचे समर्थक असलेले तालुक्यातील वरवंडी येथील.दत्तात्रय सोन्याबापू वर्पे यांच्याकडून पठार भागातील वरवंडी येथील वर्पे वस्ती व सहाणे वस्ती या दोन शाळांमध्ये वह्या वाटप करण्यात आली.
आमदारांनी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना सांगितले होते की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझा सत्कार करण्याऐवजी आपण शालेय साहित्य आणावेत त्याप्रमाणे तालुक्यातील गरजू सर्वच विद्यार्थ्यांना वह्या देण्यात आल्या परंतु वर्पे वस्ती शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष .राजाराम एकनाथ वर्पे व सहाणे मळा शाळेच्या अध्यक्षा सौ.प्रेरणा नितीन मोघे यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मदत मिळावी असे सांगितले परंतु वह्या फक्त गरजू विद्यार्थ्यांसाठीच असल्याकारणाने या दोन्ही ही शाळा पात्र ठरल्या नाही.परंतु त्यांची मागणी लक्षात घेता गावातील निष्ठावान कार्यकर्ते .दत्तात्रय सोन्याबापू वर्पे यांनी स्वखर्चाने वह्या व पेन्सिलचे शाळेत वाटप केले.यावेळी वर्पे वस्ती शाळेचे मुख्याध्यापक .शिवाजी अनारसे व सहाणे वस्ती शाळेचे मुख्याध्यापिका सौ.संगीता पुंडंगे यांनी आमदारांचे आभार मानले .
