विभागीय आयुक्त कार्यालयाने पुरवठा विभागाला दिल्या ३१ जुलै पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याच्या सूचना

Cityline Media
0

नाशिक दिनकर गायकवाड विभागातील सर्व धान्य पुरवठा अधिकाऱ्यांनी प्रलंबित ई-केवायसी दिनांक ३१ जुलैपर्यंत पूर्ण करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने संबंधित जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन ई- केवायसीची कामे ३१ जुलैपर्यंत पूर्ण करावीत. त्यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही.

तसेच सप्टेंबरनंतर ई-केवायसी झालेले लाभार्थी आढळून आल्यास असे लाभार्थी अस्तित्वात नाहीत,असे समजण्यात येईल व अशा लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यात येईल. सप्टेंबर २०२५ पासून शासन स्तरावरून ई-केवायसी झालेल्या लाभार्थ्यांनाच धान्य मंजूर करण्यात येईल, असे प्रधान सचिवांनी सांगितले आहे.

 यामुळे ई-केवायसी झालेले लाभार्थी धान्यापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी कर्मचारी यांची राहील याची नोंद सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना यासंबंधीच्या -पत्रकात देण्यात आल्या आहेत. यासंबंधीचे पत्र पुरवठा विभागाच्या उपायुक्त - प्रज्ञा बडे मिसाळ यांनी काढले आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!