नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे,सध्याच्या दुरवस्थेबाबत त्वरीत उपाययोजना आणि संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी,या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पायी मोर्चा काढत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, रस्त्यांची पाहणी करुन डागडूजी व मजबुती करणाची कामे तत्काल करावे, संबंधित ठेकेदारांकडून दोषारोप निश्चित करुन त्यांच्यावर कठोर दंडात्कमक कारवाई करावी, भविष्यात अशा प्रकारची निकृष्ट कामे होऊ नये, यासाठी देखरेखीची कडक यंत्रणा तयार करावी,
दिंडोरी तालुक्यातील जनतेला खड्ड्यापासून मुक्तता देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज ढिकले, तालुकाध्यक्ष अमोल उगले, तालुका उपाध्यक्ष नामदेव गावित, रोहन टिवटे,सतीश मालसाने,पुष्पा रहेरे,अभिजित राऊत आदी उपस्थित होते.