केरळच्या नर्सला फाशीपासुन वाचविण्यासाठी ॲड.रावसाहेब अनर्थे पा.यांचे नेदरलँड अध्यक्षांना पत्र

Cityline Media
0


 -केरळच्या नर्सला वाचवण्यासाठी ॲड रावसाहेब अनर्थे पाटील अधिवक्ता मुंबई उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय आणि अंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय हेग नेदरलँड यांचे येमेनचे अध्यक्ष डॉ रशीद अल अलीमी यांना पत्र,

पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क केरळच्या नर्सला वाचवण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील लोणी-चंद्रापूर येथील ॲड.रावसाहेब अनर्थे पाटील अधिवक्ता मुंबई उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय आणि अंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय यांनी नुकतेच येमेनचे अध्यक्ष डॉ रशीद अल अलीमी यांना पत्र,पाठवून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीपासून वाचवण्याचे प्रयत्न तीव्र झाले आहेत.येमेनमध्ये एका नागरिकाच्या हत्येच्या प्रकरणात येमेनच्या न्यायालयाने भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा सुनावली आहे.प्रियाला येमेनमध्ये १६ जुलै रोजी फाशी दिली जाण्याची शक्यता 

असताना ॲड.रावसाहेब अनर्थे पाटील अधिवक्ता मुंबई उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय आणि अंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय हेग नेदरलँड यांनी येमेनचे अध्यक्ष डॉ रशीद अल अलीमी यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.ॲड रावसाहेब अनर्थे पाटील यांनी यापूर्वी अंतरराष्ट्रीय स्तरावर कोविड १९ काळात चीन, नायजेरियन दहशतवादी संघटन, आयसिस, बांगलादेश अत्याचार, आफ्रिकेतील विविध देशांमध्ये नागरिक गटावरील अत्याचार करणारे अतिरेकी संघटनावर आंतरराष्ट्रीय फौजदार न्यायालय हेग नेदरलँड मार्फत कार्यवाही केली असुन, कतर येथिल न्यायालय यांनी माजी लष्करी अधिकारी यांच्या फाशी चे शिक्षेला स्थगिती आणि सुटकेसाठी कतर चे राजपुत्र यांना विनंती केली होती. 

प्रियाच्या कुटुंबीयांनी आणि विविध राजकीय पक्ष व संघटनांनीही तिला वाचवण्यासाठी भारत सरकारने राजनैतिक प्रयत्न करावेत, असे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ते या प्रकरणाशी संबंधित घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि शक्य ती सर्व मदत पुरवत आहे.
प्रियावर तिच्या बिझनेस पार्टनरला मारल्याचा आरोप

येमेनच्या न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, निमिषाने जुलै २०१७ मध्ये कथितरित्या तिचा स्थानिक व्यावसायिक भागीदार तलाल अब्दो मेहदी याला नशेचे औषध देऊन त्याची हत्या केली आणि दुसऱ्या नर्सच्या मदतीने त्याच्या शरीराचे तुकडे-तुकडे करून अवयव भूमिगत टाकीत फेकून दिले.

हत्येचा उलगडा झाल्यावर निमिषाला अटक करण्यात आली. प्रियाच्या कुटुंबीयांनुसार, प्रियाने तिचा जप्त केलेला पासपोर्ट परत मिळवण्यासाठी मेहदीला बेशुद्धीचे इंजेक्शन दिले होते.

ओव्हरडोजमुळे त्याचा मृत्यू झाला. सना येथील न्यायालयाने प्रियाला फाशीची शिक्षा सुनावली. तिने या निर्णयाला येमेनच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले, पण तिचे अपील फेटाळण्यात आले.

निमिषाने येमेनच्या राष्ट्राध्यक्षांकडे दयेची याचना केली, पण त्यांनी माफी देण्यास नकार दिला. ती सध्या सना येथील तुरुंगात कैद आहे.सूत्रांनी सांगितले की, निमिषा २००८ पासून येमेनमध्ये नर्स म्हणून काम करत होती. २०११ मध्ये लग्नानंतर ती पती टॉमी थॉमस सोबत येमेनला आली होती.

२०१४ मध्ये येमेनमध्ये गृह युद्धामुळे तिचे पती आपल्या मुलीसह केरळला परतले, तर निमिषा येमेनमध्येच राहिली. सूत्राने सांगितले की, मृत मेहदीचे कुटुंब हत्येच्या गुन्ह्याला माफ करण्याच्या बदल्यात पैसे (ब्लड मनी) घेण्यासही तयार नाही.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!