सातपूर औद्योगिक वसाहातील कार्बन नाका ते सिएट कंपनी रस्त्यात मनसेने केले वृक्षारोपण

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड- सातपूर औद्योगिक वसाहतीतील कार्बन नाका ते सिएट कंपनी दरम्यान रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झाली आहे. कामगारांना आपला जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने मनसेच्या वतीने रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये नुकतेच वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आले.
कार्बन नाका ते सिएट कंपनी - रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते.खड्डयांमुळे कामगारांना वाहन चालवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्यावर दहा दिवसांपूर्वी खड्डड्चांमुळे झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या औद्योगिक वसाहतीतून महानगरपालिकेला सर्वाधिक कर मिळतो तरी देखील या जिवघेण्या खड्ड्यातून चाकणमान्यांना प्रवास करावा लागत आहे.मात्र मनपा प्रशासन कोणतीही उपाययोजना करत नाही.अनेक तक्रारी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने सिएट कंपनी समोर असलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून मनसेच्या वतीने प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी मनसेचे प्रदेश चिटणीस दिनकर पाटील,मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम शेख, विभाग अध्यक्ष सचिन सिन्हा, शहर उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, विशाल भावले, ज्ञानेश्वर बगडे, सोमनाथ पाटील, गणेश जयभावे, किशोर वडजे, लक्ष्मण साळवे, विजय अहिरे, प्रवीण अहिरे,अरुण मिस्त्री, नितीन सूर्यवंशी, अमोल गवळी, निलेश पानसरे, विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष अविनाश जाधव, मयूर शिंदे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिएट कपनी समोर खड्डुचात वृक्षारोपण करताना मनसेचे प्रदेश चिटणीस दिनकर पाटील, मनसे राज्य उपाध्यक्ष सलीम शेख, मिलिंद कांबळे व मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!