ठाण्याच्या शास्त्रीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई
ठाणे विशाल सावंत- ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामे निष्कसित करण्याची कारवाई आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार सुरू आहे. लोकमान्य सावरकरनगर परिसरातील शास्त्रीनगर नाल्यावर चार गाळ्यांचे बांधकाम अनधिकृतरित्या सुरू होते. सदरचे बांधकाम पूर्णपणे निष्कसित करण्यात आले आहे.
तसेच या परिसरातील ज्येष्ठ नागरिक कट्टया लगत, हत्ती पुला जवळ, शास्त्रीनगर येथे असलेले विट सिमेंटचे ८ पिलर व त्याखालील सिमेंटचा कोबा तसेच गाळयासाठी उभारण्यात आलेले ५ भिंतीचे विट सिमेंटचे बांधकाम जे.सी.बी मशीन व मनुष्यबळाच्या साह्याने निष्कसित करण्यात आले.