मुंबईतील अधिवेशनात आमदार रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड

Cityline Media
0
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क येथे आज पार पडलेल्या दिमाखदार अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व आमदार .रविंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पक्षाचे राज्य निवडणूक अधिकारी म्हणून या निवडीची घोषणा केली. या प्रसंगी राष्ट्रीय सह - संघटनमंत्री .शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस.अरुणसिंग, मुख्यमंत्री .देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री .नितीन गडकरी, राष्ट्रीय सरचिटणीस .विनोद तावडे, खासदार छत्रपती .उदयनराजे भोसले, मुंबई शहराध्यक्ष .आशिष शेलार, केंद्रीय मंत्री .मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री .रक्षा खडसे यांच्यासह अनेक वरीष्ठ नेते, पदाधिकारी, राज्यातील मंत्री, खासदार, आमदार व राज्य भरातून आलेले विविध प्रदेश, जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

. रविंद्र चव्हाण यांची राजकीय वाटचाल अत्यंत प्रेरणादायी आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून भाजयुमो अध्यक्ष, नगरसेवक, आमदार, मंत्री अशा अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आज प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. संघटन कौशल्य, नेतृत्व क्षमता आणि जनतेशी असलेला थेट संपर्क या बळावर ते आगामी काळात पक्ष अधिक बळकट करतील, असा विश्वास आहे.
प्रसंगी सभापती राम शिंदे यांच्या सह अनेकांनी रविंद्र चव्हाण यांचे अभिनंदन सदिच्छा देऊन कौतुक केले
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!