मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल लक्ष्मण हाके यांनी
आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल, मुंबई कार्याध्यक्ष. सिद्धार्थ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली डी. बी.मार्ग पोलिस ठाणे इथे लक्ष्मण हाके यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन नुकतेच देण्यात आले.
याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई सहकार सेलचे अध्यक्ष नंदकुमार काटकर, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, मुंबई सरचिटणीस सुदर्शन सांगळे, मुंबई सरचिटणीस. विजय चिलेकर, मुंबई सरचिटणीस दीपक पारडीवाला, तालुकाध्यक्ष पांडुरंग रोडे, . किरण शिंदे, प्रवीण ठाकूर, मुंबई पदाधिकारी गोपाल परदेशी, मुंबई सचिव श्रीमती. सुनिता निवळे, महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती. पूजा पवार, युवक पदाधिकारी, सोहम पानसरे अविनाश उपाध्याय यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
