संगमनेर प्रतिनिधी काँग्रेस पक्षाला पूर्वीपासूनच त्याग आणि बलिदानाची परंपरा असून काँग्रेसची विचारधारा ही राज्यघटनेचा आदर करणारी सर्वसमावेशक आहे.माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या गेल्या आहेत.यातून संगमनेर तालुका हा राज्यात प्रगतशील राहिला आहे.ही वाटचाल कायम राखायची आहे असे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी केले.
घुलेवाडी येथे डॉ.जयश्री थोरात यांच्या उपस्थितीत भर पावसात युवक काँग्रेसच्या १६ शाखांची उद्घाटने करण्यात आली.यावेळी तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, माजी जि. प. सदस्य सिताराम राऊत, घुलेवाडीच्या सरपंच निर्मला राऊत, दलित पँथरचे राजू खरात,
बाळासाहेब पानसरे, अंकुश ताजणे, हिरालाल पगडाल, डॉ. विजय पवार, राजू आव्हाड, अनिकेत अभंग, रवि गिरी, अभिषेक तामचीकर, जीवन गायकवाड, भास्कर पानसरे, सचिन सोनवणे, सचिन शेलार, अनिकेत सोनवणे, ऋषिकेश काशीद, दीपक पाळंदे, राजेंद्र हातकर,
ओम पावबाके, संतोष खरात, विशाल कांडेकर, निखिल गुंजाळ, गणेश नवले, कांचन आव्हाड, ओंकार बिडवे, शरद पावबाके, नितीन साळुंखे, शुभम ढमाले, आकाश पानसरे, स्वाती राऊत, तानाजी शिरतार, रवी दिव्ये, अनिल के राऊत आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.