नाशिक दिनकर गायकवाड घरात कोणाला काही न सांगता निघून गेलेल्या मुलीचे अपहरण केल्याची घटना उपनगर येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे उपनगर परिसरात राहतात. ते कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांची मुलगी घरात कोणाला काही न सांगता घराबाहेर निघून गेली. बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. या मुलीला कोणी तरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून तिचे अपहरण केले असावे, या संशयातून उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.