मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क कोकण विभागातील भाजपा आमदारांची विशेष बैठक मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी पार पडली.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोकणातील सर्व आमदारांच्या विधानसभा क्षेत्रातील प्रगती व विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.भिवंडी शहर व भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा,वाहतूक व्यवस्थापन,मेट्रो प्रकल्प अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर चर्चा केली.
मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व विषयांवर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विकासकामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले.
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष. रविंद्र चव्हाण, महसूल मंत्री.चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री. नितेश राणे यांच्यासह इतर माननीय आमदार उपस्थित होते.
भिवंडी पश्चिमच्या सर्वांगीण विकासासाठी कायम सकारात्मक पाठिंबा देणाऱ्या मुख्यमंत्री.देवेंद्र फडणवीस यांचेयावेळी सर्व आमदारांनी कृतज्ञता व्यक्त केली.