आश्वी संजय गायकवाड मातंग समाजाचे भुषण व भाजपाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावर भूमाता ब्रिगेडरच्या संस्थापक तुप्ती देसाई यांनी अपशब्द काढत चुकीचा व्हिडीओ व्हायरल करून समाजामध्ये नितीन दिनकर यांची बदनामी केली असुन त्यांच्यावर सरकारने तत्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे संतोष भडकवाड यांनी केली आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांचा पदाचा त्वरित राजीनामा घेऊन पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी नुकताच तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.तृप्ती देसाईच्या विरोधात आता अहिल्यानगर जिल्ह्यातील सह संगमनेर तालुक्यातील भारतीय लहुजू सेना अक्रमक झाली असुन संघटनेच्या वतीनी संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील पोलिस ठाणे मध्ये संघटनेच्या वतीने निवेदन दिले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, तृप्ती देसाई यांनी नितीन दिनकर यांच्या खाजगी कार्यक्रमातील व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने तोडुन मोडुन त्याचा दुर वापर करत प्रसार मध्यामामध्ये प्रकाशित केला होता.त्यामुळे नितीन दिनकर यांची तसेच सामाजाची बदनामी झाली.यामुळे तुप्ती देसाई कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय लहुजी सेने नी केली निवेदनावर गणेश बलसाने,संतोष भडकवाड,विलास कदम,संतोष बलसाने,रविंद्र कांबळे दत्तात्रय लांहुडे,अनिकेत गायकवाड,सुनल बोरूडे,भाऊसाहेब अव्हाड,जालिंदर आऱणे,सुनिल साळवे,चंद्रकांत कांबळे राजेंद्र त्रिभुवन, यांच्या सह्या आहेत.
