मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क मुंबई, वरळी येथील आयोजित मराठी भाषा विजयी मेळाव्यात भाकप-मालेच्या वतीने कॉ. उदय भट व कॉ. विजय कुलकर्णी हे उपस्थित होते.
या मेळाव्याला महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची प्रमुख भाषणे झाली.
यावेळी खा. संजय राऊत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ.डॉ.अजित नवले,भारतीय कम्युनिस्ट
पक्षाचे नेते कॉ. प्रकाश रेड्डी,राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खा. सुप्रिया सुळे, आ. जितेंद्र आव्हाड, आ.आदित्य ठाकरे, मा. खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार, शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील, समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, अमित ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
