श्रीरामपूरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करा-अनुराधा आदीक

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम शहरातील प्रभाग चार मधील अक्षरवेल चौकात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फलकाचे अनावरण नुकतेच मा.नगराध्यक्ष अनुराधा आदीक यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी अनुराधा आदीक म्हणाल्या की श्रीरामपूर शहरात प्रत्येक भागांमध्ये राष्ट्रवादी पक्षाची संघटना स्थापन करून पक्ष बळकट करा.
प्रसंगी अनुराधा आदिक पुढे बोलताना म्हणाल्या की श्रीरामपूर शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.पंचवीस वर्षाची प्रलंबित कामे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक,मा.आमदार वरिष्ठ उपाध्यक्ष लहु कानडे यांच्याकडे पाठपुरावा करून विकासाची भरीव कामे करण्यात आलेली आहेत.

राष्ट्रवादी संघटना स्थापनेसाठी लागेल ते सहकारी करू असे अनुराधा आदिक म्हणाल्या.यावेळी राष्ट्रवादी नेते अरुण पाटील नाईक , प्रभाग चारचे मा.नगरसेवक मा. नगरसेवक हाजी मुक्तार शहा, राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष साजिद  मिर्झा,आमनशेख, दीपक कदम राष्ट्रवादी शहराध्यक्ष अनुसूचित विभाग, शिक्षक नेते साहेबराव रकटे,मा. नगरसेविका अनिता प्रकाश ढोकणे,सौ.मुथा एकलव्य सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी गांगुर्डे,अधिक जोशी आधी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. राजीव साळवे,राष्ट्रवादी युवक अध्यक्ष गोपाल वायदेशकर, मीडिया सेल अध्यक्ष रंजन वावहल,पत्रकार राजेंद्र सूर्यवंशी,अनिल भाऊ छाबडा, राजेंद्र नारंग, चांगदेव देवराय, रामदास ढोकणे सचिन शरणागत,बापू ढोकणे,विशाल ढोकणे, संजय गायकवाड,माने बडे,नागरगोजे,तुसे जावेद शाह, फ्रान्सिस कदम, फैयाज कुरेशी, प्रशांत संसारे,राजेंद्र इनामके, मधुकर ठोंबरे, किशोर कांबळे आदींनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवर स्थानिक नागरिकांचे यांचे आभार भागाचे नगरसेवक प्रकाश ढोकणे यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!