विद्यार्थ्यांची आर्थिक लुट करणाऱ्या खाजगी क्लासेसवर कारवाई करण्याची मागणी

Cityline Media
0
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने प्रांताधिकार्‍यांना दिले निवेदन
श्रीरामपूर दिपक कदम ९ वी ते १२वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या क्लास चालक  शिक्षकांवर कडक कारवाई  करावी अन्यथा रिपाई च्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात  येईल असा इशारा रिपाई चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी निवेदनाद्वारे नुकताच दिला आहे.यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार वनिता कल्हापुरे यांना रिपाईच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा संघटक राजू नाना गायकवाड महिला आघाडीच्या सौ.रमादेवी धीवर शहराध्यक्ष विजय पवार राष्ट्रीय जनसेना पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड  यांच्या हस्ते देण्यात आले

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अहिल्यानगर जिल्ह्यात तसेच श्रीरामपूर शहरात गेली अनेक वर्षापासून ९ ते १२ वी  पर्यंत विविध विषय तसेच सी ई टी जी  ई ई शिकवण्याचे खाजगी क्लास धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करून त्या नोंदणीच्या आधारे

 बऱ्याच शिक्षकांनी आपले क्लास श्रीरामपूर तालुका व शहरामध्ये थाटले आहे त्या आधारे विद्यार्थ्यांची आर्थिक लूट चालू आहे ९ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तीन विषय इंग्लिश गणित विज्ञान या विषयाचे १६ हजार रुपये घेतले जातात तसेच दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तीन विषयाचे ३० हजार रुपये घेतले जातात.

अकरावी बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून एका विषयाचे २० हजार रुपये तर  चार विषय शिकवले जातात बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री सायन्स या चार विषयाचे ८० हजार रुपये घेतले जातात एका तासाला २०० ते २५० विद्यार्थी एका क्लास मध्ये क्लासला येतात

 ६ ते ११ वाजेपर्यंत चार बॅच होतात म्हणजे आठशे ते नऊशे विद्यार्थी क्लासमध्ये रोज शिकतात तसेच सी जी ई इ ची फी अडीच लाख रुपये आहे  श्रीरामपूर शहरांमध्ये क्लास ची संख्या जवळजवळ २५ ते ३०  संख्या आहे त्यामुळे विद्यार्थ्यांकडून घेणाऱ्या पैशाची

 बेरीज केली तर करोडो रुपयांच्या घरात जाते म्हणून अशा मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची आर्थिक लूट केली जाते हे लक्षात येईल तसेच एवढी मोठी आर्थिक उलाढाल असताना सरकारला जीएसटी भरतात का? याचा देखील सखोल तपास केला पाहिजे

 तसे पाहायला गेले तर खाजगी क्लास चालवायला सरकारी मान्यता नसताना तरी देखील अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करून देखील शासन तसेच लोकप्रतिनिधी या खाजगी क्लास चालकांना चकार शब्द सुद्धा विचारात नाही म्हणून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या क्लास चालकांचे दप्तर तपासून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येऊन विद्यार्थ्यांना परवडेल अशी वाजवी फी घेऊन त्याचा फलक क्लास बाहेर मोठ्या अक्षरात लावण्यात यावे तसेच मुलांना शिकवणारे शिक्षक प्रशिक्षित आहेत का त्याची देखील चौकशी झाली पाहिजे अन्यथा रिपाईच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष  त्रिभुवन यांनी दिला आहे त्यावेळी मनोज काळे कारभारी त्रिभुवन संजय बोरगे उज्वला येवलेकर बाबासाहेब पवार विलास जाधव संघराज त्रिभुवन आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!