राहाता प्नतिनिधी तालुक्यातील लोणी खुर्द, गावातील निर्मळ प्रिंपी रस्त्यावर असणाऱ्या एका चिकन विक्रेत्याने चिकन सोलण्याच्या ड्रममध्ये सोललेल्या कोबडीवर जाणीवपूर्वक लघुशंका केली आणि तेच चिकन ग्राहकांना विकले,अशा धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठा गदारोळ माजला आहे.
हा प्रकार अन्नदूषणाचा नव्हे—तर धार्मिक भावना दुखावणारा,दोन समाजात तेढ पसरवणारा आणि माणुसकीला काळीमा फासणारा आहे अशा सतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे हा इसम अशा प्रकारचे कृत्य नेहमी करत असेल असा अंदाज घेऊन आसपासच्या कुणीतरी लक्ष ठेवून हा व्हिडिओ काढला असे बोलले जातेय
व्हिडिओ व्हायरल होताच लोणी खुर्द गावातील नागरिकांनी एकत्र येऊन लोणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे ठरवले आहे,या चिकन दुकानदारावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
याबाबत फिर्याद देण्यासाठी सर्व लोकांनी वेताळबाबा चौकात एकत्र जमावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे
