पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परिसरातील त्रिशक्ती गेट येथे उभारण्यात आलेल्या दुसरे बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (नि.)भूषण गोखले आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा बोलताना म्हणाले की संपूर्ण विश्वात प्रत्येक क्षेत्रात भारत पुढे राहील हे आपले जीवन ध्येय असले पाहिजे, यासाठीची प्रेरणा आणि ऊर्जा पहिले बाजीराव पेशवे यांच्या जीवन चरित्रातून मिळते.पहिल्या बाजीरावांनी तंजावर ते अफगाणिस्तान पर्यंत आणि अफगाणिस्तान ते बंगाल मार्गे कटक पर्यंत एका मोठ्या हिंदवी साम्राज्याची स्थापना केले, जे छत्रपती शिवरायांचे स्वप्न होते.
गुलामीचे निशाण उध्वस्त करुन स्वातंत्र्याचा दीप लावण्याचे काम त्यांनी यशस्वीपणे केले.तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला विस्तारित करण्याचा श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा इतिहास आहे. त्यांनी लढलेल्या ४१ लढायांपैकी एकाही लढाईत पराभव स्वीकारला नाही.
उत्तरेला काबूल आणि पूर्वेला बंगालपर्यंत मराठी साम्राज्यचा विस्तार करण्याचे काम त्यांनी केले. वेग ही त्यांची सर्वात मोठी रणनीती होती. पालखेड येथे झालेल्या युद्धाचा उल्लेख रणनितीनुसार सर्वात चांगली लढाई होय, असा माँटगोमेरी यांच्यासारख्या सेनानींनी त्यांच्या युद्ध कौशल्याचा गौरव केला आहे. आपल्या अनेक महानायकांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यासाठी जिथे देशाच्या संरक्षण सज्जतेचे प्रशिक्षण दिले जाते अशा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसारख्या ठिकाणापेक्षा दुसरे योग्य स्थान नाही.
