श्रीरामपूर दिपक कदम येथील हिंद सेवा मंडळाच्या शां.ज. पाटणी विद्यालय तर्फे आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
लहान मुले व मुलींनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत ज्ञानोबा माऊली तुकाराम गजरात पालखी मिरवणूक काढली . टाळ,कलश व डोईवर तुळस घेऊन दिंडीत चालणारे बाल वारकरी हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.शां.ज.पाटणी विद्यालयाच्या मैदानात हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय
जोशी,सहसचिव अशोक उपाध्ये,क.जे. सोमय्या हायस्कूलचे मा अध्यक्ष संजय छल्लारे, दादा वामन जोशी नवीन मराठी शाळा बालवाडी विभागाचे अध्यक्ष सुशील गांधी, विद्यालयाचे अध्यक्ष भरत कुंकूलोळ, पर्यवेक्षक चंद्रशेखर वाघ, प्रसिद्ध व्यावसायिक विनीत कुंकलोळ व आकांक्षा कुंकलोळ यांच्या उपस्थितीत दिंडी सोहळ्यानिमित्त विठ्ठल रुक्माई व ग्रंथ पूजन केले.
नेवासा रोडने छोट्या वारकऱ्यांची दिंडी निघाली त्यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम व पावलीवर ठेका धरला. चौका चौकात दिंडीचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी न्यू एस मार्ट किराणा बाजारचे विशाल जाधव यांनी दिंडीचे स्वागत करून बाल वारकऱ्यांना खाऊचे वाटप केले.
कांदा मार्केट चौकात व कामगार हॉस्पिटल चौकात उभे रिंगण घेऊन विद्यार्थ्यांनी लेझीम व फुगड्यांचा आस्वाद घेतला. विद्यालयातून निघालेली दिंडी नेवासा रोड, कांदा मार्केट, कामगार हॉस्पिटल परिसर, साईबाबा मंदिर परिसरातून पुन्हा विद्यालयात समारोप करण्यात आला.
हर्षद चव्हाण, ओम काकडे याने विठ्ठलाची,स्वरा शेटे हिने रुक्माई, गंधार बेलसरेने तुकारामांची व अनुष्का काळे हिने जनाबाई आदी विद्यार्थ्यांनी संतांची सुंदर भूमिका साकारली.याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कळमकर व आभार कैलास जेजुरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागाच्या अनुप्रीती पवार,उर्मिला पुजारी,स्नेहल गाडेकर, नितीन यशवंत,बाबासाहेब औटी,.निलेश क्षीरसागर,गणेश नागपुरे, राकेश शिंदे, संजय ठाकूर, दिनेश मुळे,संतोष एडके, किरण पुंड, प्रसाद ब्राह्मणे,सुयश मकासरे, दत्तात्रय नारळे आदी प्रयत्नशील होते.
