नाशिक दिनकर गायकवाड येवला नगर परिषद कार्यालयात उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या आधिपत्याखाली व मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या उपस्थितीत येवला नगरपरिषद मालकीच्या सिटी सर्व्हे नंबर ३८०७ मधील व्यावसायिक दुकान केंद्रातील एकूण १०२ गाळ्यांचे आरक्षण सोडत शिवन्या जाधव या मुलीच्या हस्ते सर्व उपस्थित नागरिकांच्या समोर काढण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी शाल व गुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर कार्यक्रमाची प्रास्ताविक कर अधिकारी रोहित पगार यांनी केले.
हे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे-दिव्यांगांसाठी एकूण पाच गाळे तळमजल्यावर राखीव ठेवण्यात आलेले आहेत. त्यानुसार दिव्यांगांसाठी तळमजला आरक्षित गाळे क्रमांक ९, २३, २८, ३४ व ३८ असे आहे. त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटके जमाती या प्रवर्गासाठी एकूण ५ गाळे आरक्षित
ठेवण्यात आले. त्यानुसार तळ मजल्यावर गाळा क्रमांक १४ व १६, पहिल्या मजल्यावर गाळा क्रमांक ११ व २९ व दुसऱ्या मजल्यावरील गाळा क्रमांक ४ असे आहे.
या कार्यक्रमाला बाबासाहेब गाढवे, तुषार आहेर, कर अधिकारी रोहित पगार, चंद्रकांत भोये, काकासाहेब शिरसाट, दीपक जावळे यांच्यासह प्रमोद सस्कर, योगेश सोनवणे, नितीन काबरा, दीपक पाटोदकर, अतुल घटे, नानासाहेब शिंदे व इतर नागरिक उपस्थित होते.