नाशिक दिनकर गायकवाड निफाड तालुक्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी डिजिटल पेमेंट व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. शेतकरी आता बाजार समितीकडून होणाऱ्या विक्रीच्या रकमेचे पेमेंट थेट 'बंतोष' या मोबाईल ॲपद्वारे घेऊ शकणार आहेत.
यामुळे शेतक-यांचे पैसे सुरक्षितपणे, पारदर्शक पद्धतीने व वेळेत मिळणार असून, शेतक-यांच्या आर्थिकव्यवस्थापनाला मदत होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपली केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
बाजार समिती कार्यालयात शेतक-यांच्या केवायसीसाठी आवश्यक सुविधा व कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व खर्च वाचणार असून, रोख व्यवहारावर अवलंबून राहावे लागणार नाही, अशी माहिती बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.