नाशिक मधील अधिकाऱ्यांचा समावेश
नाशिक दिनकर गायकवाड शासनाने येथील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार स वर्गातील अधिकान्यांच्या बदल्या केल्या असून त्यामध्ये नाशिकला दोन नवीन उपजिल्हाधिकारी मिळाले आहेत तर निवडणुक अधिकारी शशिकांत मंगरुळे यांची बदली निफाडला प्रांताधिकारी या पदावर करण्यात आली आहे.
शासनाने महसूल विभागातील तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी यासह वर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे सर्वसाधारण ३८ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिकला निवडणूक विभागामध्ये काम करणारे
शशिकांत मंगरुळे यांची निफाडला प्रांत अधिकारी या पदावरती बदली करण्यात आली आहे तर अभिजीत नाईक यांची सातारा वरून नाशिकला पाटबंधारे उपजिल्हाधिकारी एक,तसेच सीमा अहिरे यांची धुळ्यावरून नाशिकला रोजगार हमी उपजिल्हाधिकारी.,अर्चना मोरे यांची जळगाव रोजगार हमी वरून निवडणूक अधिकारी जळगाव या पदावर बदली करण्यात आलेली आहे. तहसीलदार सह वर्गामध्ये मात्र नाशिक मधील तहसीलदारांच्या बदलीत कोणीही तहसीलदार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहेत.
