संभाजीनगर सिटीलाईन न्यूज नेटवर्क येथील जालना रोडवर झालेल्या अतिक्रमण कारवाईने बेघर झालेले नागरिक, व्यावसायिक व धार्मिक स्थळे यांचा मुद्दा आता अधिक गतीने समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ.कल्याण काळे यांनी नुकतीच महानगरपालिका आयुक्त जी.श्रीकांत यांची भेट घेत सखोल चर्चा केली.
खासदार डॉ.काळेंनी प्रशासनासमोर पुढील मागण्या मांडल्या अशा की बेघर नागरिकांना घरकुल योजनेतून घरे, व्यावसायिकांना पर्यायी जागा, वाढीव टीडीआर /एफ एस आय व रोख मोबदला,धार्मिक स्थळांना व स्मशानभूमींना सन्मानजनक पर्यायी जागा,पाडलेल्या
कमानींची पुनर्बांधणी यावेळी आयुक्त श्रीकांत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत काही महत्वाच्या आश्वासनांची घोषणा केलीअतिक्रमण कारवाईपूर्वी किमान ८ दिवसांची मुदत दिली जाईल, चिकलठाणा रस्ता अलाइनमेंटमध्ये बदल करून घरे वाचवली जातील,म्हाडा,पीएम आवास योजनेतून घरे, कामगार विभागातून रु४.५ लाखांचे अनुदान,धार्मिक स्थळे व स्मशानभूमींसाठी जागा निश्चित करण्याचे काम सुरू, पाडलेल्या कमानी पुन्हा उभारण्यात येतील
या बैठकीस मुकुंदवाडी,संजय नगर,चिकलठाणा येथील नागरिकांचे शिष्टमंडळ, आजी-माजी नगरसेवक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.