शेतकरी आणि शेतमजूरात दहशत; बंदोबस्ताची वनविभागाकडे मागणी
नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील पांडाणे व परिसरात शेतात वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या संभाव्य नुकसानी टाळण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्यात येवून बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, या मागणीसाठी पांडाणे ग्रामपंचायतीने वनविभागाकडे पत्राव्दारे केली आहे.
पांडाणे आणि परीसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे अहिवंतवाडी,जिरवाडे,अंबानेर, पांडाणे, पुणेगाव, अस्वलीपाडा, परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतात राहतात. बिबट्याचे कुठे ना कुठे नित्य दर्शन होत आहे. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या
भरदिवसा बिबट्याची दहशत
-शेतात वस्तीवर राहणाऱ्या आजुबाजुच्या शेतकऱ्यांना घरातुन बाहेर पडणे अवघड झाले आहे. सायंकाळी शाळेतुन येणारी लहान मुले घरी यायला भयभीत झाले आहेत. शेतात मजुर येण्यासाठी धजावत नाही. त्यामुळे शेतीचे कामे करणे मोठे आव्हान बनले आहे.
-भास्कर निमसे, पांडाणे शेतकरी
नागरिकांना सायंकाळी सहा वाजेनंतर बाहेर पडणे अवघड झाले आहे. अनेक वेळा बिबट्याने अनेक ठिकाणी सुर्यास्त होण्याच्या वेळेलाच शेतकऱ्यांना दर्शन दिल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. शेतीला जोडधंदा म्हणुन अनेक शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय करण्यासाठी कर्ज घेवुन मोठमोठी महागाची दुधाळ जनावरे घेतलेली आहेत. परंतु बिबट्यासारख्या हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढुन दर्शन घडत असल्याने त्यांच्यावर हल्ला होवुन मोठी आर्थिक होऊ शकते, अशी भिती शेतकरी व्यक्त करीत आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी शेळ्या, लहान वासरे किंवा पाळीव कुत्रे बिबट्याच्या भक्षस्थानी सापडुन मृत्यु पडल्याच्या घटना घडुन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तशा प्रकारच्या तक्रारी वेळोवेळी वनविभागाकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केल्या आहे. त्यावेळी
संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी येवुन तसे पंचनामे सुद्धा करण्यात आले आहेत, परंतु संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून अद्याप कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नसल्याची खंत शेतकरी करीत आहेत. त्याच कालावधीत पांडाणे शिवारातील गट नं ४२/२ मधील राहत्या घराजवळ रात्री एक वाजेच्या सुमारास दोन बिबटे फिरत असल्याचे त्यांच्या सीसी टिव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसुन आले होते. त्यामुळे मनुष्य किंवा पशुधन भक्षस्थानी सापडुन कोणत्याही प्रकारची हानी होवु नये याकरीता वनविभागाने सदर बाब गांभिर्याने विचारात घेवुन शेतकऱ्यांच्या होणाऱ्या संभाव्य नुकसानी टाळण्यासाठी वनपरीक्षेत्र अधिकारी दिंडोरी कार्यालयाकडे पिंजरा लावण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय पांडाणे यांचे पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.
-आमची प्रत्येक रात्र काळरात्र
आमचे दुधाळ जनावरे आणि शेतीसाठी बैल हे सर्व रात्री गोठ्यात असतात. त्यामुळे प्रत्येक रात्र ही काळरात्र असल्याचेच वाटते. कारण पाळीव कुत्रे बिबट्याने उचलुन नेल्याने नेहमी सावध रहावे लागत आहे. त्यामुळे वनविभागाकडून या परिसरात पिंजरा बसविण्यात यावा.
संजय गांगुर्डे, शेतकरी