नाशिक दिनकर गायकवाड नाशिक येथील आनंदी सहवास सेवाभावी संस्थेचे प्रतिभा व किरण सोनार या दाम्पत्यच्या वतीने निगडोळ येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
निगडोळ येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक राजेंद्र उगले, मा.उपसरपंच शरद मालसाने यांना या चळवळीची माहिती मिळाली असता त्यांनी सोनार यांच्याशी संपर्क केला. शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्याची गरज लक्षात आणून दिल्याने 'आनंदी सहवास'ने जि.प. शाळा निगडोळ येथे येऊन सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या वह्या व इतर शालेय उपयोगी साहित्याचे वाटप केले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बापू रहेरे, सरपंच कृष्णा रहेरे, शशीकांत मालसाने, प्रतिभा सोनार, किरण सोनार, के. पी. सोनार, कवी प्राचार्य राजेश्वर शेळके, संदीप सोनार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र उगले यांनी तर आभार मुख्याध्यापक राजेंद्र पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक निलेश भारती, नितीन पवार, विश्वास आहेर, बळीराम भोये यांनी परिश्रम घेतले.