जादूटोणा भोवला;कोपरगावातून ‌१५ दिवस फरार असलेल्या धर्मगुरूस पोलिसांनी केली अटक

Cityline Media
0
आभासी धर्मगुरुकडून पिढीत लोकांच्या अज्ञान आणि परिस्थितीचा गैरफायदा 

कोपरगाव विशाल वाकचौरे कावीळसारख्या गंभीर आजारावर तंत्रमंत्राने उपचार करत महिलेला दवाखान्याच्या औषधोपचारांपासून दूर ठेवणाऱ्या आणि परिणामी तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या चर्चच्या फादरला अखेर पोलिसांनी १५ दिवस सापळा रचून अटक केली आहे.अंधश्रद्धेच्या विरोधात महाराष्ट्रभर जनतेने आवाज उठवल्यानंतर आणि विविध शहरांमध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल व विविध हिंदुत्ववादी संघटनांचे मोर्चे निघाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. घटनेनंतर आरोपी फादर चंद्रशेखर गौंडा हा १५ दिवस फरार झाला होता. त्याच्या अटकेसाठी विशेष पथक नेमण्यात आले होते. अखेर त्याला कोपरगाव परिसरातून अटक करण्यात आली.
-मोठं धर्मांतर रॅकेट कार्यरत असल्याची संशयास्पद माहिती
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव आणि आसपासच्या भागात एका मोठ्या धर्मांतर रॅकेटचे संचालन सुरू असल्याचे संकेत मिळाले असून, त्यात गरिब,आजारी आणि अशिक्षित व्यक्तींना टार्गेट केलं जात असल्याची चर्चा आहे. "तांत्रिक उपचार", "मुक्ती प्रार्थना", "भूतबाधा दूर करणे", "चमत्कारी तेल" यासारख्या मार्गाने आधी मानसिक पकड निर्माण केली जाते, त्यानंतर धार्मिक बदल घडवून आणला जातो, असा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
-पोलिसांकडून पुढील तपास सुरू
फादर विरोधात महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल असून, त्याच्याशी संबंधित चर्चची तपासणी,आर्थिक व्यवहारांची चौकशी, तसेच धर्मांतराचे आरोप तपासले जात आहेत.मृत महिलेच्या कुटुंबीयांनीही न्यायाची मागणी करत पोलिसांवर कठोर कारवाईचा आग्रह धरला आहे.

ही घटना समाजाला अंधश्रद्धेचे किती भीषण स्वरूप असू शकते, याचे जिवंत उदाहरण आहे. अशा प्रकारांच्या विरोधात जागरूकता आणि कायद्याची अंमलबजावणी ही काळाची गरज बनली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!