नाशिक दिनकर गायकवाड सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरील दोन्ही बाजूकडील जिर्ण झालेले झाडे धोकादायक ठरत आहे. रस्त्यांच्या कडेवरील जीर्ण झाडांचा वेळीच बंदोबस्त करावीत, अशी मागणी होत आहे.
वाऱ्यामुळे जीर्ण झाडांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणारे पादचारी व वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अनेक रस्त्यांच्या दोन्ही बाजूला मोठमोठी झाडे आहेत. ही सर्व झाडे कितीतरी वर्षापूर्वी लावलेली आहेत. बहुतेक झाडे जीर्ण अवस्थेत आहेत.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने जीर्ण झाडांची पाहणी करुन आवश्यक ते जीर्ण झाडे तोडावी अशी मागणी आहे.