विधानभवन, मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता,संगमनेर आणि नेवासा तालुक्यातील आरोग्य विभागांच्या विविध विषयांसंदर्भात आरोग्यमंत्री. प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडली.
राहता येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम, संगमनेर येथे स्वतंत्र महिला रूग्णालय तसेच नेवासा विधानसभा मतदार संघातील आरोग्य विभागाच्या विविध विषयांबाबत या बैठकीत प्राधान्याने चर्चा झाली.
बैठकीस आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, मा. खासदार डॉ. सुजय विखे-पा. यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.