पालकांच्या वाढत्या सहभागामुळे प्रवरानगरच्या गांधी संकुलनात पालक संमेलन उत्साहात

Cityline Media
0
 

प्रवरानगर (वार्ताहर) : प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालय व कन्या विद्यालयात नुकतेच इयत्ता पाचवी ते दहावी, शिष्यवृत्ती व गुरुकुल वर्गातील विद्यार्थ्यांचे पालक संमेलन पालकांच्या वाढत्या सहभागामुळे उत्साहात पार पडले झाले. या पालक संमेलन प्रसंगी प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका सौ.नलिनी जाधव व उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी व्यासपीठावरील मान्यवर पालकांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सुजाता ठाकरे व संजय ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका नलिनी जाधव या होत्या.

 विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने या पालक संमेलनात सकारात्मक बाबींवर चर्चा झाली. प्राचार्य विनायक मेथवडे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध प्रकल्पांविषयी माहिती देत विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आव्हान केले.

 उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता हा तंत्रज्ञानाचा नवीन विषय विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी असल्याचे सांगून डिजिटल लर्निंगच्या माध्यमातून अध्यापन होणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी विलास गभाले व विलास गावित यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
 मुख्याध्यापिका सौ.नलिनी जाधव यांनी आपल्या  मनोगतातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी सहकार्य करण्याच्या आवाहन केले. यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून इंद्रभान बेंद्रे, माया मेटे,पत्रकार शरद तांबे, गणेश चेचरे यांच्यासह शिक्षक पालक उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता उगले अश्विनी सोहोनी यांनी केले तर माधुरी वडघुले व सौ.टावरे यांनी आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!