नाशिक दिनकर गायकवाड- जिल्हा परिषदेतील एका विभागाचे प्रमुख लैंगिक छळवाद प्रकरणी दोषी आढळून आल्याने असे प्रकार जिल्ह्यात इतरत्र घडले असण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच पेठ तालुक्यातील आरोग्य विभागाच्या एका प्राथमिक आरोग्य केंद्रात याच प्रकाराची पुनरावृत्ती घडली असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे प्राप्त झाली. छाया-गुगल
सदर घटनेचा तपास करण्यासाठी विशाखा समितीने थेट वादग्रस्त प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली.भेटी दरम्यान तेथील महिला कर्मचारी यांनी वैद्यकीय अधिकारी यांच्या विरोधात अधिकाराचा गैरवापर करून कारवाईचे भय दाखवून लैंगिक छळवाद करत असल्याचे पुरावे सादर केले असल्याचे समजते.
सदरचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुपूर्द केल्यानंतर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याचे समजते. त्यांच्याकडील त्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा कार्यभार तातडीने काढून घेण्यात आला आहे.त्याच केंद्रावरील तृतीय श्रेणी कर्मचारी हे देखील
अशाच प्रकाराची पुनरावृत्ती करत असल्याने त्यांच्यावरही कारवाईची टंगती तलवार असल्याचे समजते.दरम्यान,या प्रकाराबाबत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास दुजोरा दिला असून त्याबाबतचा अहवाल दोन महिनेपूर्वीच वरिष्ठ कार्यालयास दिला असल्याचे सांगण्यात आले.एकंदर शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही महिलांवरील लैंगिक छळाच्या प्रकरणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.