शासन निर्णयानुसार अंशतःअनुदानित,अघोषित आणि त्रुटीपूर्ण शाळांना अनुदान मंजूर
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या शिक्षक बांधवांच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे. शिक्षकांची एकजूट आणि विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठबळामुळे या लढ्याला अधिक बळ आणि दिशा मिळाली असे बोलले जातेय.
दि.१४ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार अंशतःअनुदानित,अघोषित आणि त्रुटीपूर्ण शाळांना अनुदान मंजूर करण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्ष निधी वितरण न झाल्यामुळे राज्यभरात शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता.
आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलक शिक्षक बांधवांची भेटीसाठी आमदार सत्यजित तांबे नुकतेच पोहोचले होते त्यांनी त्यांच्या भावना, व्यथा आणि अडचणी लागलीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी प्रामाणिकपणे पुढाकार घेतला.
यानंतर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ नामदार गिरीश महाजन यांना आझाद मैदानावर जाऊन आंदोलन शिक्षक बांधवांची भेट घेण्यास सांगितलं आणि रात्री उशिरा गिरीश महाजनांनी आंदोलक शिक्षकांची भेट घेऊन त्यांना विश्वास दिला.
काल गिरीश महाजन यांच्या मंत्रालयातील केबिनमध्ये सर्व संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. त्यानंतर सायंकाळी मा. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात आली.या बैठकीत आंदोलक शिक्षक बांधवांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
१.अधिवेशन संपण्या आधीच निधीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
२. पुढील ८ दिवसांत वेतन थेट शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात येईल,अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री महोदयांनी दिली. त्यानंतर सायंकाळी नामदार महाजन यांनी पुन्हा आझाद मैदानावर जाऊन आंदोलक शिक्षकांशी थेट संवाद साधला.सरकारने दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून शिक्षक बांधवांनी आपले आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला जाईल,असा मला पूर्ण विश्वास आहे.मात्र यापुढे अशा प्रकारची वेळ शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था चालकांवर पुन्हा येऊ नये,याची खात्री सरकारने आता द्यावी आणि कृतीतून दाखवावी, हीच अपेक्षा आहे असे आंदोलकांनी स्पष्ट केले.कारण ही लढाई केवळ वेतनासाठी नव्हती,ही लढाई होती शिक्षकांचा सन्मान, शैक्षणिक संस्थांचं अस्तित्व आणि भविष्यातील विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भवितव्य टिकवण्यासाठी असे देखील