अहिल्यानगर दिपक कदम श्रीरामपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीला विलंब होत असल्याने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची भेट घेऊन सदर पूर्णाकृती पुतळ्याचे काम तातडीने पूर्णत्वास न्यावे अशा मागणीचे निवेदन आमदार हेमंत ओगलेसह असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या विषय अनेक दिवस प्रलंबित आहे. सदर कामाची शासकीय परवानगी पूर्ण होऊन देखील पुतळ्याची उभारणी झालेली नाही. तरी कोणत्या कारणास्तव हा पुतळा प्रलंबित राहिला आहे व त्याची काय कारणे आहेत, याबाबत अवगत करावे अशी विनंती मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे शिष्टमंडळाने केली.
यावेळी श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, श्रीरामपूर नगरपरिषदेचे मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे, शिर्डी संस्थानचे मा. विश्वस्त सचिन गुजर,अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मा. सभापती. बाबासाहेब दिघे,श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती. सुधीर नवले, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष.प्रशांत ओगले. संदीप मगर.प्रेमचंद कुंकलाळ. वैभव पंडित,.सुनील शिरसाट,.सुनील मगर,.अशोक लोंढे,.रितेश येडके.मच्छिंद्र ढोकणे.सुरेश दुबे.शंकरराव गायकवाड,.सुरेश बनसोडे,.सुहास राठोड,किरण खंडागळे,.सोमनाथ पटाईत.अतुल काळे आदींसह वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
