मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे दालनात मनमाड शहरातील झोपडपट्टी अतिक्रमण,आय.यु.डी.पी. भुखंड,हुडकोतील घरे हस्तांतरित करणे कामी नुकतीच बैठक पार पडली.
या वेळी नियमानुसार नजराणा भरून फ्री होल्ड करणे बाबत निर्णय घेण्यात आला व शहरातील झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी सदर जमिनी हस्तांतरित करणे बाबत सकारात्मक चर्चा झाली,तसेच हुडकोतील कुटुंबियांना लवकरात लवकर सात बारावर नावांची प्रक्रिया करण्यात यावी असे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
बैठकीस मनमाड शहराध्यक्ष मयूर भाऊ बोरसे,तालुका अध्यक्ष साईनाथ भाऊ गिडगे व आय.यू.डी.पी. विभागाचे नगरसेवक महेंद्र शिरसाट यांचे पाठपुराव्याला यश आले असल्याचे बोलले जातेय.
बैठकीस योगेश पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी उपस्थित होते.