नाशिक दिनकर गायकवाड सप्तशृंगगडावर शासनाचा वन विभाग,जयहिंद लोकचळवळ व ग्रामपंचायतीच्या वतीने सुमारे ५५ हेक्टर क्षेत्रावर ५५ हजार वृक्ष लागवड करण्याचा शुभारभ करण्यात आला.
यावेळी मुख्य वनसंरक्षक मल्लिका अर्जुन,आयकर विभागाचे भरत आंधळे, डॉ.सुधीर तांबे,वन विकास महामंडळाचे व्यवस्थापक उमेश वावरे, उप वनसंरक्षक राकेश शेपट, सहाय्यक वनरक्षक संतोष सोनवणे यांच्या हस्ते वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
या वृक्षाची लागवड केली जाणार असून त्याचे संगोपन सुध्दा केले जाणार आहे. यावेळी मुख्य वन संरक्षक मल्लिका अर्जुन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.वृक्ष लागवड करुन भागणार नाही तर वृक्षाची जोपासणा करणे महत्त्वाचे आहे, असे मल्लिका अर्जुन यांनी सांगितले.
यावेळी डॉ. सुधीर तांबे, संदीप बेनके, संजय ठोक, शशीकांत देसले यांनी मनोगत व्यक्त केले. संयोजन वन परिक्षेत्र अधिकारी दिपावली गायकवाड, बाली मंजूळकर, रामकृष्ण देवकर, प्रा.डी.व्ही.वर्षे यांनी केले.याप्रसंगी डॉ.शितलकुमार पहाडे, राजेंद्र गांगुर्डे, सचिन वडजे, प्रा. कोल्हे, नियाज शेख, विलास पेलमहाले, डॉ. योगेश गोसावी, रमेश पवार, राजेश गवळी,भाऊसाहेब बागूल, नाना राठोड, किशोर बोरा आदी उपस्थित होते.डी.व्ही. वर्षे, जनार्दन मैद यांनी आभार मानले.
