मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री ना..एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व विधिमंडळातील सहकाऱ्यां समवेत जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या शिवकालीन १२ किल्ल्यांच्या ऐतिहासिक निर्णयाचा विधानभवन परिसरात जल्लोष साजरा करण्यात आला.
महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा,शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी हे ११ किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ला अशा एकूण १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेली दुर्ग संपदा म्हणजे महाराष्ट्राच्या शौर्याचा, आत्म सन्मानाचा आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा जिवंत ठेवा आहे. या किल्ल्यांची निवड 'मराठा मिलिटरी लँडस्केप' या शिर्षकांतर्गत झाली असून, हे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत अभिमानाचे क्षण आहेत.
छत्रपती शिवरायांचा दुर्ग निर्मितीचा दृष्टिकोन,त्यामागील धोरणशास्त्र,जलव्यवस्थापन आणि नैसर्गिक भूगोलाशी सुसंगत असलेली स्थापत्य शैली हे सर्व आता जागतिक स्तरावर प्रेरणादायी ठरणार आहे.
