नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील रिपाइं नेते मुकुंद गांगुर्डे यांचे चिरंजीव आशुतोष मुकुंद गांगुर्डे यांनी त्याच्या स्वतःच्या हाताने काढलेले चित्र रेखाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांना भेट दिले आहे.
आशुतोष गांगुर्डे याने लहानपणासून चित्रकलेची आवड जोपासली असून त्याने आपल्या कलेने विविध नेत्यांची चित्रे रेखाटली आहे. लहान वयात तो चांगली कला जोपासत असल्याने त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी दत्तात्रय पाटील यांना त्यांचे हाताने रेखाटलेली चित्र भेट दिल्याने पाटील यांनी त्याचे कौतुक केले. यावेळी वंदनराव बागुल, बाळासाहेब गांगुर्डे, मिलिंद गांगुर्डे, शिवम गांगुर्डे आदी उपस्थित होते.