नाशिक दिनकर गायकवाड वि.दा.सावरकरांच्या 'संगीत संन्यस्त खड्ग' या नाटकाचा आज रविवारी १३ तारखेला कालिदास कलामंदिर येथे प्रयोग आयोजित करण्यात आला होता. मात्र,या नाटकात तथागत गौतम बुद्ध यांच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाची थट्टा आणि अभद्र भाषेचा उल्लेख असल्याने बौद्ध बांधवांनी त्यास आक्षेप घेत हे नाटक रद्द करण्याची मागणी शनिवारी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्यानुसार हे नाटक रद्द करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले की, संगीत संन्यस्त खड्ग हे नाटक गौतम बुद्ध यांच्या विचारांशी विसंगत असल्याचे पुढे आले आहे.
'संगीत संन्यस्त खड्ग' या नाटकात गौतम बुद्धांच्या विचारांबाबत अनेक विसंगत बाबी दाखविण्यात ऑलेल्या आहे. यामुळे यास विरोध करण्यात आला असून या नाटकाचा प्रयोग रद्द करण्याची मागणी करण्यात आली. किरण मोहिते, बौद्ध उपासक
बुद्धांच्या विचारांशी विसंगत असल्याचे पुढे आले आहे. या नाटकाच्या सर्व प्रयोगांना स्थगिती द्यावी आणि आयोजक संस्था व नाट्यनिर्मिती करणाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी भदंत नागधम्मो, भदंत सुगत, के. के.बच्छाव, ताराचंद मोतवाल उपस्थित होते.