राहुरी येथील ख्रिस्ती समाजाचा उद्रेक

Cityline Media
0
राहुरी प्रतिनिधी ख्रिस्ती समाजाविषयी बेताल वक्तव्य व अपमानास्पद शब्द वापरून ख्रिस्ती धर्मगुरुना जीवे मारण्याची धमकी देणारे आमदार गोपीचंद पडळकर यांचेवर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करणे बाबत येथील ख्रिस्ती समाजाने नुकतेच निवेदन दिले असून मोठा आक्रोश व्यक्त केला.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,.०६ जून २०२५ रोजी ऋतुजा राजगे मु.पो फुगवार ता. मिरज जी. सांगली यांनी केलेल्या आत्म्हत्तेबाबत सीआयडी चौकशी व्हावी तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे बेताल वक्तव्य करून ख्रिस्ती धर्मगुरूंना जिवे ठार मारणे बाबत बक्षिसे जाहीर केल त्याबाबत आज आम्ही राहुरी तालुक्यातील सकल ख्रिस्ती समाज मोठ्या जमावाने मोर्चा काढत आपणांस निवेदन सादर करत आहोत.

आमदार गोपीचंद पडळकर हे संविधानिक पदी असणारे व्यक्ती आहेत.आणि असे असतांना त्यांनी ख्रिस्ती धर्माविषयी अपमानास्पद व बेताल वक्तव्य केले आहे. ख्रिस्ती धर्मगुरूंना मारण्याकरीता माननीय पद्धतीला  बक्षीसे बक्षीस जाहीर आहे.अश्या प्रकारे वक्तव्य करून ख्रिस्ती धर्मगुरूंच्या मनात द्वेषाचे वातावरण तयार केले आहे.

तसेच बेताल वक्तव्य करून त्यांच्या मनात ख्रिस्ती समजा विषयीची असलेली प्रचंड चीड व्यक्त आहे.तसेच राज्यघटना धर्मांना समान दृष्टीने पाहते. असे असतांना आणि पडळकर हे आमदार असूनही ते भेदभाव करतात आमदार पडळकर यांच्या विधानामुळे अल्प संख्यांक ख्रिस्ती सामाज्याच्या धर्म स्वातंत्र्यावर गदा शकते धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण करु शकतात आमदार म्हणून संविधानाचे रक्षण करण आणि सर्व नागरिकांच्या हक्कांचा सन्मान करण्याची शपथ घेतलेले आमदार असे कसे करू शकतात का ? आ.पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाविषयी केलेली विधान भारतीय संविधानाच्या मूळ तत्वांना धक्का देणारी आहे 

तेव्हा आम्ही सर्व सकल ख्रिस्ती समाज शासनादरबारी या निवेदनाद्वारे मागणी करतो की आमदार गोपीचंद पडळकर यांचेवर भारतीय दंड संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांची आमदारकी तत्काळ रद्द करण्यात यावी निवेदनावर बिशेप मॅन्युअल गायकवाड रेव्ह. सॅम्युअल साळवे यांच्या प्रातिनिधिक प्नतिनिधी म्हणून सह्या आहेत
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!