नवीन जलकुंभाजवळील मखमलाबाद रामकृष्णनगर रस्त्यावर खड्डेच खड्डे

Cityline Media
0
सामाजिक कार्यकर्त्या सौ.रागिनी जाधव यांची महानगर पालिकेकडे दुरुस्तीची मागणी

नाशिक दिनकर गायकवाड नाशिक शहरातील मखमलाबाद रामकृष्णनगर येथील,नवीन जलकुंभ जवळ सततच्या पावसामुळे दोनच दिवसात रस्त्याला अक्षरशः खड्डेच खड्डे पडल्याने येथील स्थानिकांना तसेच शालेय विद्यार्थी, शिक्षक ,कर्मचारी,नागरिक,स्कूल बस  या रस्त्याने जात असताना अडचणीचा सामना करत मार्ग काढावा लागतो महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे आजपर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळणच झालेली दिसतेय रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचल्याने दुर्गंधीयुक्त पाणी डासांची उत्पत्ती होत आहे या रस्त्याची पाण्यात खड्डा की खड्यात पाणी असे परिस्थिती  निर्माण झाली आहे ती अतिशय चिंताजनक आहे. या रस्त्याची महानगरपालिकेकडून त्वरित करण्यात यावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.रागिनी जाधव यांनी केली आहे.
सौ.जाधव पुढे बोलताना म्हणाल्या की या खड्यांचा त्रास येथील सर्व नागरिकांना सहन करावा लागत आहे त्यामूळे महानगरपालिका बांधकाम विभाग सतत शांती नगर ते ड्रीम कॅस्टर या रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचे काम करीत असतात परंतु या ठिकाणी  प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष करीत असतात यामुळे रात्रीचे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढत आहे.तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि त्वरीत रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम करावे अशी तक्रार स्थानिकांची व येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.रागिनी जाधव यांच्याकडून  करण्यात येत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!