श्रीरामपूर दिपक कदम शहरातील पिण्याच्या पाण्याच्या तलावात शौचालयाचा मैला सोडणाऱ्या समाजकंटाकावर कडक कारवाई करावी तसेच श्रीरामपूर शहराला शुद्ध पाणी मिळावे पाटात दूषित पाणी सोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी यासाठी श्रीरामपूर नगर परिषदेवर आज नागरिकांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले की रामभरोसे असलेल्या तलावाला वीस फुटाची संरक्षण भिंत बांधून त्या ठिकाणी सीसी कॅमेरे लावण्यात यावे तसेच तलावाला २४ तास वॉचमनचा पहारा देण्यात यावा या मागणीसाठी १ जुलै रोजी श्रीरामपूर नगर परिषदेवर रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने करण्यात आली.
त्यावेळी मागण्याचे निवेदन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना रिपाईच्या जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये शिवसेनेचे नेते संजय छल्लारे मा. उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले त्यावेळी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष
सुभाष त्रिभुवन म्हणाले की शासनाच्या निधीतून नगरपालिकेने लाखो रुपये खर्चून गोंधवणी या ठिकाणी श्रीरामपूरकरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे परंतु तेच पाणी सुरक्षित राहिले नाही कारण गेली सात आठ वर्षापासून मिल्लत नगर या ठिकाणी
राहणाऱ्या हनीफ उस्मान शहा रऊफ उस्मान शहा फिरोज रशीद पठाण या लोकांनी तलावात जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या मुख्य सिमेंटच्या पाईप लाईनवर शौचालय बांधून त्यात तिन्ही घरांचे संपूर्ण कुटुंब रोज शौचालय मूत्र करायचे त्यामुळे संपूर्ण श्रीरामपूर शहर
गेली सात आठ वर्षापासून त्या लोकांचा शौचालयाचा मैला मिश्रित पाणी मिळाले आहे म्हणून हा अत्यंत भयंकर गंभीर गुन्हा करून माणुसकीला काळीमा फासणारा किळसवाणा प्रकार करून निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे.
त्यांना जेवढी शिक्षा द्याल तेवढी कमीच आहे म्हणून त्या समाजकंटकाच्या घरावर बुलडोझर फिरवा अशी मागणी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी केले आहे त्यावेळी संजय छल्लारे म्हणाले साठवण तलावात जाणाऱ्या पिण्याच्या पाईपच्या लाईन वरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे.
अन्यथा नगरपरिषदेवर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला तसेच राजेंद्र सोनवणे म्हणाले की श्रीरामपूर शहरातील नगरपालिकेच्या पाण्याने आपले देव देवता धुवून मनोभावाने पूजाच्या करतात तेच पाणी जर शौचालयाचा मैला मिश्रित आहे ज्यांनी हे कृत्य केलं
त्याला माफी देता कामा नाही असेही सोनवणे म्हणाले अभिजीत लिपटे म्हणाले की नगरपालिकेने श्रीरामपूर शहरातील गोरगरिबाच्या टपऱ्या काढून त्यांना देशोधडीला लावले तशी तत्वर्ता पाईपलाईन वरील अतिक्रमण काढण्यासाठी वापरावी.
यावेळी भैय्या भिसे सागर कुदळे रमादेवी धीवर मुक्तार शहा रियाज पठाण रुपेश हरकल बाली बेलदार आदींनी मनोगत व्यक्त केले त्यावेळी राम शिंदे लखन वायकर किशोर ठोकळ सुरेंद्र पानपाटील संघराज त्रिभुवन राहुल लुक्कड विजय जाधव सुनील कासार राहुल शहाणे
शाहरुख मन्सुरी रवी चव्हाण आप्पासाहेब गाडेकर अनिल इंगळे सिद्धांत गायकवाड रोहित नाईक प्रकाश कोळेकर सुनील दंडवते श्रीराम निकम गोरख शिवदे उज्वला येवलेकर कारभारी त्रिभुवन दीपक माखीजा गणेश पालकर आदी उपस्थित होते सूत्रसंचालन राजेंद्र सोनवणे यांनी केले आभार अभिजीत लिपटे यांनी मानले
