संगमनेर पंचायत समितीत कृषी दिन साजरा
संगमनेर संजय गायकवाड- सध्याच्या यांत्रिक युगाच्या काळात शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती न करता नवीन तंत्राचा वापर करून शेती करावी. योग्य व्यवस्थापन केले तर केली तर शेती तोट्यात न जाता फायदेशीर ठरेल असे प्रतिपादन सौ.नीलम खताळ यांनी केले.
संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात मा.मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृषी दिनाच्या कार्यक्रमात सौ.खताळ बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर ,तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, पंचायत समितीचे कृषी अधिकारी व्ही.एन. उघडे ,कृषीभूषण पुरस्कार विजेते विठ्ठलदास आसावा, शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते तुकाराम गुंजाळ कक्ष अधिकारी राजेश थिटमे अधीक्षक मोहन कडलग आणि गणेश तोटे आदी मान्यवर उपस्थित होते .
सौ .खताळ पुढे म्हणाल्या की, पूर्वीच्या काळी शेतकरी शेतीत योग्य ते व्यवस्थापन करत होते त्यामुळे एकरी ३० ते ४० पोते धान्य निघत होते.मात्र आता एका एकरात १० पोते सुद्धा धान्य निघणे अवघड झाले आहे . शेतीतील व्यवस्थापनाच्या कमतरतेमुळे हा परिणाम झाला आहे . पिकाचे योग्य नियोजन आणि मेहनत केली तर शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन वाढण्यास मदत होईल असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्रातील व राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहे, त्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सौ.खताळ यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील दुष्काळी भागा तील शेतीला पाणी नाही ही बाब आमदार अमोल खताळ यांनी लक्षात घेऊन प्रत्येक गावातील शेवटच्या टोकापर्यंत शेतीला पाणी कसे पोहोचेल यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू केलेआहे. शेतीला पाणी मिळाले तर या तालुक्यातील शेतकऱ्यांचे आयुष्य बदलू शकते त्यासाठी जलसंपदामंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आमदार खताळ यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्याचा निश्चय केला असल्याचे सौ.खताळ यांनी सांगितले.
प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी बोडके यांनी केले .सूत्रसंचालन पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी अजय पावसे यांनी केले तर आभार सहाय्यक कृषी अधिकारी विजय शेलार यांनी आभार मानले यावेळी कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी विठ्ठलदास आसावा, अंजीर शेती उत्पादक भीमा उघडे, शेडनेट भाजीपाला उत्पादक शेतकरी प्रशांत नवले, केळी उत्पादक शेतकरी किरण गोसावी, द्राक्ष उत्पादक संतोष डोंगरे तर बचत गटातून स्वतःच्या पायावर उभ्या राहणाऱ्या सौ.शोभना सोनवणे यांनी आपले अनुभव व्यक्त केले
शेतीचे भवितव्य उज्वल
संगमनेर तालुक्यातील निमज येथे आपण."गेल्या पंधरा वर्षापासून पारंपरिक शेतीला बाजूला ठेवून आधुनिक व व्यावसायिक दृष्टिकोन मनाशी बाळगून शेती करत आहे. शेतकऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन मनाशी बाळगून शेती केली तर ती शेती कधीच तोट्यात जाऊ शकत नाही शेती व्यवसायात खऱ्या अर्थाने तुम्हाला टिकायचे असेल तर नवनवीन प्रयोग आत्मसात करा परस्परांशी संवाद ठेवा आणि नेहमी सकारात्मक राहा.शेतीचं भवितव्य उज्वल आहे – फक्त दिशादर्शक विचार, सहकार्य आणि नवे प्रयोग गरजेचे आहेत.शेतीवर प्रेम ठेवा. विचार बदला. दिशा बदला. यश तुमचं असेल.
तुकाराम गुंजाळ
महाराष्ट्र शासन शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते शेतकरी
-शेतीत होत असलेले नवनवीन प्रयोग, तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले आहे
मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या काळात साधनसामग्री कमी असूनही उत्पादनक्षम शेती केली जात होती. आज मात्र सर्व सुविधा असूनही शेतीची उत्पादकता कमी आहे ,ती वाढविण्याची गरज आहे."शेतीत होत असलेले नवे प्रयोग आणि नवे तंत्रज्ञान आता सर्वांसाठी खुले झाले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीत वापरण्याची वेळ आली आहे. याचा योग्य वापर करून शेतीला आधुनिकतेशी जोड देण्याची काळाची गरज आहे .आज एकीकडे ‘पंढरीच्या जयघोषात वारी सुरू आहे, तर दुसरीकडे शेतकरी आपापल्या शेतात खरिपाच्या पेरणीत व्यस्त आहेत. शेती केवळ व्यवसाय राहिलेला नाही, तर ती आपली संस्कृती, आपलं श्रद्धास्थान बनली आहे. भक्ती आणि कष्ट एकत्र असतील तर विठ्ठलही तुमच्यापर्यंत पोहोचतो."आजची एकादशी आणि हा सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला परंपरा आणि तंत्रज्ञान या दोघांमधील समन्वय शिकवतो.
प्रवीण गोसावी
उपविभागीय कृषी अधिकारी श्रीरामपूर
शेत जमीनीवर पाला पाचोळा पेटवून जिवाणू नष्ट करु नका
शेतातील कृषी उत्पन्ना व्यतिरिक्त शिल्लक राहणारा काडीकचरा, पालापाचोळा, ऊसाचे पाचट आदि.काही शेतकरी पेटवून नष्ट करतात. शेतातील अवशेष जाळल्यामुळे जिवाणू नष्ट होऊन जमिनी तील सेंद्रिय कर्ब कमी झाल्याने शेतीची उत्पादकता घटल्याचे निदर्शनास येत आहे. पर्यावरण व जमीन या दोन्ही साठीही हे नुकसानकारक असल्याचे अनेक संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे.शासनस्तरावर शेती अवशेष जाळणाऱ्या शेतकऱ्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होत आहेत
डॉ.विठ्ठलदास असावा
कृषीभूषण पुरस्कार विजेते
