श्रीरामपूर दिपक कदम राज्यातील १८ पोलिस अधिकाऱ्यांच्य बदल्या नुकत्याच करण्यात आल्या आहेत.त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि शिर्डी उपविभागामध्ये कार्यरत असताना गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेले सोमनाथ वाघचौरे यांची आता श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षकपदी वर्णी लागल्याने गुन्हेगारी विश्वाने चांगलाच धसका घेतला आहे.
जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि शिर्डी,संगमनेर या तीन उपविभागात 'अनेक वर्षे पोलीस उपअधीक्षक असताना सोमनाथ वाघचौरे यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले होते आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी त्यांची ओळख झाली होती. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आलेले आहे. सध्या राज्य राखीव पोलीस बल (गट क्रं.५) दौंडचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आता ते श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर येत आहेत. ते लवकरच पदाची सुत्रे हाती घेणार असल्याने तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे.
