उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते राहुरी फॅक्टरी येथील १०० व्या शाखा फलकाचे अनावरण

Cityline Media
0


राहुरी फॅक्टरी प्रतिनिधी आपला पक्ष शिव शाहु फुले आंबेडकराच्या विचारांचा पक्ष आहे,त्यामुळे राज्यातील शेतकरी कष्टकरी वर्गाला आपला आधार वाटतो, म्हणून या राज्याचे नेतृत्व आपण करावे अशी सर्वांची इच्छा आहे, आणि हे सर्व करायचे असेल तर राज्यात वाड्या, वस्त्यावर, झोपडपर्यंत जावून पक्ष संघटन बळकट करणे आवश्यक आहे. आपण राज्याचे नेतृत्व करत आहात, ही आमच्या अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, आपण शतायुषी व्हा व राज्याचे नेतृत्व करा अशी आमची इच्छा आहे, असे प्रतिपादन मा.आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिव शाहु फुले आंबेडकराच्या विचारांचा पक्ष आहे.सर्व धर्मीय विचारधारेचा आहे, सगळयांना एकत्र घेवुन पुढे जाणारी विचारधारा आहे,आणि याच विचारधारेची कास आम्ही धरलेली आहे.स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी जे काही राजकारण होते,

जो काही सुसंस्कृतपणा होता,तो आम्ही राजकारणात सुसंस्कृतपणा जपतो आहे, आणि तो आपण अंगीकारला पाहीजेत.यातूनच आपल्या सर्व समाजाला पुढे घेवुन गेलं पाहीजे. तरच भविष्यात भारताचं महाराष्ट्राचं आणि आपल्या अहिल्यानगरचं भल होणार आहे. हा विचार आम्ही महाराष्ट्रात कुठेही गेलो तर सांगत असतो, मी ज्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून तुमच्या समोर उभा आहे,

स्वतःहा लहू कानडेंनी पुढाकार घेवुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारात घेवुन श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदार संघात जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्याण्णव शाखांच्या पक्षाच्या फलकाचे उद्घाटन केलेले आहे,आणि आज माझे हस्ते सर्वांच्या महत्त्वाच राहुरी कारखान्याचे ठिकाण येथे शंभराव्या शाखेच्या फलकाच अनावरण झाले आहे,असे जाहीर करतो.असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले लहू कानडे यांनी पराभवाने खचू नये,मी त्यांना राज्याची जबाबदारी दिली आहे, त्यामुळे मोठया उमेदीने काम करा

असे लहू कानडेंना उद्देशून म्हणाले.पक्षाचा प्रचार करणे त्यातून जनतेमधे मिसळून पक्षाची भूमिका समजावून सांगणे,पक्षाच्या माध्यमातून लोंकाच्या अडीअडचणी सोडवणे हे आपलं काम आहे.आणि हीच परंपरा आपल्या वडीलधा-यांनी अंगिकारलेली आहे.राजकीय जीवनात ३५ वर्षाचा:अनुभव आहे.

मी खासदार,राज्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशी विविध पदे माझे:बारामतीकरांच्या पाठींब्याच्या जोरावर सर्व जनतेच्या प्रेमाने मी त्यामधून काम करतो.ज्या राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात ही छोटी सभा होती आहे,तेथे युगपुरुष छञपती शिवाजी महारांजाचा अश्वारुढ पुतळा आहे,

की ज्या पुढे जाऊन महाराजांच्या पुढे आम्ही नतमस्तक झालो,आणि महाराजांनी जो विचार मांडलेला आहे,त्याच विचाराने आपण काम करावे माझी आपणाला विनंती आहे,मी लहानपणी येथे अतिशय वैभव पाहिलेले आहे, स्वर्गीय बाबुराव दादा तनपुरेंनी त्या काळात हा कारखाना उभा केला.अनेक मातब्बर नेते

या जिल्हयात जन्माला येवुन गेले, विखे पाटील, काळे,कोल्हे, घुले, गडाख, नागवडेंनी  कारखाने उभे केले.अनेक मान्यवरांनी कारखाने उभे केले.माझा जन्म देवळाली प्रवरा मध्ये झालेला आहे. कारखान्याची परिस्थिती बिकट असुन सर्व संचालकांनी काटकसर करुन कारखाना चालविला पाहीजे.

 तसेच सर्व शेतक-यांनी हा कारखाना आपला आहे,या भावनेने कारखान्याला ऊस दिला पाहीजे,मी देखील यात चांगल्या प्रकारचे सहकार्य करेल,या सर्वांचे सहकार्य लाभले तर कारखाना ऊर्जित अवस्थेत येणेस वेळ लागणार नाही,व यातून कारखान्याला पुर्वीचे वैभव प्राप्त होईल, यांत शंका नाही असे अजित पवार म्हणाले.

कार्यक्रमास अशोक कानडे, अरुण पाटील नाईक,अमृत
धुमाळ, कार्लस साठे, राजेंद्र कोकणे, सतीश बोर्डे, नानासाहेब रेवाळे, अक्षय नाईक, ज्ञानदेव आदिक, रमेश आप्पा आव्हाड, अजय खिलारी, वेणुनाथ कोतकर, रवि राजुळे,राजेंद्र औताडे, सचिन जगताप, बंडोपत बोडखे, 

आशिष शिंदे,किशोर कांबळे,मधुकर ठोंबरे,लक्ष्मण अभंग, रमेश सातपुते, संदीप खरात,हरिभाऊ बनसोडे, ढोणे सर, तुकाराम चिंधे, राधाकृष्ण तांबे,आण्णासाहेब ढोणे,जमीर शेख, रुबिना पठाण,भैया शाह, शिवाजी गांगुर्डे,निलेश भालेराव, मंगलसिंग सांळुके,दिपक कदम, बाबसाहेब खोसरे,बाबाजी ढोकचौळे,

 सुदाम पटारे,संदीप खरात, प्रकाश चौधरी,सर्जेराव खरात,बाबासाहेब दुस,नंदू उल्हारे,अनिल बिडे,साहेबराव पटारे, विठ्ठल ठोकळ,आकाश शिंदे,सागर शिंदे,विशाल शिंदे, पठाण गुरुजी, डॉ. सर्जेराव सोळुंके,नितीश शिंदे, प्रतीक कांबळे, सम्राट माळवदे,योगेश आंबेडकर,

बाळासाहेब लोखंडे, सचिन निमसे,बाळासाहेब आढाव, राजेंद्र बोरुडे,सुभेदार अमोल वांळुज,विलास संसारे, योगेश भालेकर, बाबासाहेब पठारे, संतोष कदम,वसंत कदम, सागर भालेराव,मोहन तांबे, अभिषेक राऊत,किशोर थोरात,आबासाहेब वांळुज,जुगल किशोर गोसावी,दिपक ढूस,डॉ. रोहित बोरावके,किरण पाटील कडू, शानूर शेख, उमेश खिलारी, अमोल मुसमाडे, रमेश जाधव, योगेश काळे, कदीर पटेल व बहुसंख्य पदाधिकारी, व कार्यकर्तेउपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!