कोल्हार प्रतिनिधी- पारंपरिक शिक्षणप्रणाली ही पुस्तकी ज्ञानावर आधारलेली आहे.त्यामुळे पदवी मिळाल्यानंतर नोकरी लागेलच याची शाश्वती देता येत नाही. कारण नोकरीसाठी कौशल्याची आवश्यकता असते.ऑन जॉब ट्रेनिग प्रशिक्षणातून नोकरीसाठी लागणाऱ्या कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाते.त्यातून कुशल कारागिरांची निर्मिती होते. म्हणून ऑन जॉब ट्रेनिग प्रशिक्षण हा शिक्षण प्रणालीतील अभिनव प्रयोग असल्याचे प्रतिपादन कनिष्ठ प्रक्षिणार्थी सल्लागार मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषांगिक सुचना केंद्र (बी.टी.आर.आय) कोपरगाव येथील वैशाली कुरापाटी यांनी केले.
कोल्हार येथील 'लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या 'कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात' सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजने अंतर्गत नुकतेच 'कार्यानुभव संधी व ऑन जॉब ट्रेनिग प्रशिक्षण' या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन वैशाली कुरापाटी यांच्या हस्ते झाले.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कुरापाटी बोलत होत्या.यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य संभाजीराजे देवकर पा. होते.ही कार्यशाळा दोन सत्रात घेण्यात आली.
पहिल्या सत्रात वैशाली कुरापाटी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.त्यांनी आपल्या भाषणात 'ऑन जॉब ट्रेनिग प्रशिक्षण कसे दिले जाते' याविषयी स्लाईड शोद्वारे मार्गदर्शन केले. संभाजीराजे देवकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात 'ऑन जॉब ट्रेनिग प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी कसे महत्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले.या सत्राचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीभाऊ आहेर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात ही कार्यशाळा घेण्यामागील भूमिका स्पष्ट केली. आभार समन्वयक प्रा. शरद दिघे यांनी मानले.
दुसऱ्या सत्रात बाळासाहेब उंबरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.त्यांनी आपल्या भाषणात 'नवीन शैक्षणिक धोरण आणि व्यवसायाच्या संधी' याविषयी माहिती दिली. या सत्रात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीभाऊ आहेर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या सत्राचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. शरद दिघे यांनी केले तर प्रा. बाबासाहेब पेहरे यांनी आभार मानले.कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. सौ.संगीता धिमते व प्रा. मनीषा वडितके यांनी केले. या कार्यक्रमासाठी राहाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ घोलप, सात्रळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे,दिलीप शेळके,ज्ञानेश्वर खर्डे पा., डॉ. अर्जुन आहेर पाटील,. कल्याण खर्डे पा.विनायक राऊत, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.