पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क पुणे महापालिका क्षेत्रात वापरण्यात येणारे पाणी तसेच नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्या बाबतच्या गंभीर समस्येबाबत पुणे महापालिकेच्या कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीत पाणी वापराबाबत महापालिकेने योग्य उपाय योजना कराव्यात,सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी व्यवस्था उभी करावी,अशा सूचना केल्या.जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील बैठकीस राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ आमदार. भीमराव तापकीर,
आमदार. सिध्दार्थ शिरोळे,आमदार.हेमंत रासने, आमदार बापुसाहेब पठारे, आमदार. सुनिल कांबळे, आमदार. शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी. जितेंद्र हुडी, महापालिकेचे आयुक्त. नवल किशोर राम, कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक. हनुमंत गुणाले,अधिक्षक अभियंता. हेमंत धुमाळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
