सेवानिवृत्ती गौरव सोहळा व दौलतनामा पुस्तक प्रकाशन
कोपरगाव(प्रतिनिधी) जेव्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो,तेव्हा पोलीस अधिकारी म्हणून आपली जबाबदारी सक्षम पार पाडावी लागते.नगर, नाशिक, मुंबई आदी ठिकाणी विविध जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक ,पोलीस निरीक्षक व नंतर पोलीस उपअधीक्षक म्हणून दौलतराव जाधव यांची भूमिका लोककल्याणकारी राहीली असून चोरी,दरोडे, शेतीवाडीचे वाद,खुन आदी विविध प्रकारच्या गुन्ह्याचा तपास लावत त्यांनी आपले कर्तव्य बजावले.पोलीस दलातील त्यांच्या कार्यकाळात सर्वच घटकांना त्यांनी न्याय दिला." असे प्रतिपादन श्रीरामपूर बाजार समितीचे मा. सभापती नानासाहेब पवार यांनी केले.
शिर्डी येथे साई पालखी निवारा सभागृहात पोलीस उपाधीक्षक दौलतराव जाधव यांच्या सेवापुर्ती सोहळ्यात अध्यक्षपदावरून बोलत होते.३८ वर्ष प्रदिर्घ सेवा केल्यानंतर पोलीस उपाधीक्षक जाधव सेवानिवृत्त झाले त्यांच्या जीवनावर आधारित दौलतनामा पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक शिरिष वमने, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राजेश पवार, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व लेखक सुभाष सोनवणे, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे, बाळासाहेब पवार,मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तूवर, उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, अमृत संजीवनीचे अध्यक्ष बाळासाहेब संधान, प्रशांत होन, प्रसाद नाईक, मुंबई न्यायालयाचे विधीज्ञ विपुल दुसिंग, ॲड संग्राम जाधव, शिवाजी वक्ते, कैलास वक्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नंदूआबा गोंदकर, नितीनराव शिंदे, ज्योतिषाचार्य श्री शिंदे, पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड , बांधकाम व्यावसायिक सुंदर पवार,अरुणर येवले ,विठ्ठलराव सोळंके, दिलीपराव शिंदे आप्पासाहेब पवार, रवींद्र गोंदकर, आनंदराव चव्हाण, डॉ गोरक्षनाथ रोकडे, रोहिदास होन, भिवराव दहे, जयद्रथ होन, धीरज बोरावके, प्रभाकर जाधव, देवराम जाधव, भिवराज जाधव, सौ राजश्री जाधव, सौ.काजोल होन, कार्यक्रमाचे आयोजक केशवराव होन, अनिल मुसमाडे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
नानासाहेब पवार व पोलीस उपाधीक्षक वमने यांच्या हस्ते दौलतराव जाधव यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना जाधव यांनी अनेक चांगल्या वाईट घटना ३८ वर्षाच्या कार्यकाळात घडल्या असल्याचे सांगितले. प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत पोलीस उपअधीक्षक पदावर सेवानिवृत्त होताना मन भरून आले. आपल्या अडचणीच्या काळात कुटुंबाने मित्रपरिवाराने मोठी साथ दिली.
यापुढे देखील सामाजिक कामात नेहमी पुढे राहणार असून समाजातील येणाऱ्या कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे त्यांनी सांगितले. पत्नी राजश्री जाधव, मुलगा ॲड संग्राम जाधव, मुलगी काजोल होन यांनी मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण जावळे यांनी केले तर आभार मा. सरपंच केशवराव होन यांनी मानले.कार्यक्रमास परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
