वारी पंढरीची,ज्ञानगंगा प्रवरेची भव्य सोहळ्याचे उस्फुर्त आयोजन
श्रीरामपूर दिपक कदम आध्यात्मिक परंपरेचा गौरव करणाऱ्या 'वारी पंढरीची, ज्ञानगंगा प्रवरेची' या भव्य सोहळ्याचे आयोजन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.आषाढी वारीनिमित्त लोणी येथे नुकतेच विखे पाटील सैनिकी स्कूल समोरील प्रांगणात हा विशेष उपक्रम पार पडला आहे. या सोहळ्यात १५ हजारांहून अधिक विद्यार्थी वारकरी वेषात सहभागी झाले होते.
टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठुनामाच्या जयघोषात पंढरीचा प्रतिरूप रिंगण सोहळा साकार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गावातून विद्यार्थ्यांच्या दिंड्या सजून तसेच पालक व शिक्षकही त्यात सहभागी झाले. विठ्ठलभक्तीचा उत्सव साजरा करत सर्वजण यावेळी भारावून गेले.
राधाकृष्ण विखे पाटील सपत्नीक फुगडीचा आनंद घेतला यावेळी यावेळी मा. खासदार डॉ. सुजय विखे पा. व जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी फुगडीचा आंनद घेउन पंढरीचा अनुभव घेतला
या उपक्रमामागील संकल्पना ही प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्याकडून करण्यात आली., पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचा वारकरी संप्रदायातील वारसा पुढे नेण्याचा आणि नव्या पिढीला अध्यात्माशी जोडण्याचा प्रयत्न या वारीतून करण्यात आला.
यावेळी जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,ह.भ.प.उध्वव महाराज मंडलिक मा. मंत्री आण्णासाहेब म्हस्के,जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शालिनी विखे पाटील मा. खासदार डॉक्टर सुजय विखे पा.शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ,विविध संस्थाचे संचालक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
