पालकांनी मुलांना सकस आहार द्यावा-संभाजी जोंधळे

Cityline Media
0
आश्वी संजय गायकवाड पालकांनी विद्यार्थ्यांना पिझ्झा बर्गर ऐवजी सकस आहार दिला पाहीजे असे प्रतिपादन शिक्षक व्याख्याते संभाजी जोंधळे यांनी मांची हिल येथील यशवंतराव होळकर पब्लिक स्कूलच्या  पालक शिक्षक, मेळाव्यात केले.यावेळी संस्थेच्या सचिव नीलिमा गुणे ,विभाग प्रमुख पंडितराव डेंगळे आदि उपस्थित होते.
पब्लिक स्कुलच्या आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांच्या पालक मेळाव्यात संभाजी जोंधळे यांनी  उत्तम पालकत्व कसे?असावे या विषयावर आपल्या व्याख्यानातून बोलताना त्यांनी शिक्षक पालक व विद्यार्थी हे एकमेकांशी पूरक बाब असून आई वडील या दोघांचाही मुलांच्या जडणघडणीमध्ये कसा सिंहाचा वाटा असतो हे त्यांनी स्पष्ट केले.

पालक म्हणजे काय तर  पा म्हणजे  पालन - पोषण करणारा, ल म्हणजे लक्ष देणारा, म्हणजे कर्तव्यदक्ष म्हणून पालकांनी जागरूकपणे लक्ष देणे गरजेचे आहे.पालकांनी मुलांना पिझ्झा बर्गर ऐवजी सकस आहार देणे गरजेचे आहे कारण त्यावर त्यांची विचार करण्याची क्षमता अवलंबून असते.

आपण जर मुलांना सकस आहार दिला नाही तर त्याचे परिणाम त्यांच्या शिक्षण प्रक्रियेत दिसून येतात.वर्गात लक्ष न देणे, चुळबुळ करणे,गोंधळ करणे हे त्याचे एक कारण असू शकते. पालकांनी आपल्या मुलांना जवळ घेऊन त्यांच्याशी प्रेमाने वागणे गरजेचे आहे.

मुलांचा सर्वांगीण विकास हा फक्त शिक्षकांवर किंवा शाळेवर अवलंबून नसून मुले आठ तास शाळेत असतात तर उरलेले १६ तास ते घरीच असतात. घरच्या वातावरणात ते घडत असतात,त्यामुळे पालकांनी आपल्या सभोवतालच्या वातावरणाचाही विचार करणे गरजेचे आहे असे बोलताना स्पष्ट केले.

पालकांशी संवाद साधताना त्यांनी प्रत्येक पालकाला आपण मुलांसाठी किती वेळ देऊ शकता असा प्रश्न विचारला, आपण लग्न समारंभ, इतर कामे यासाठी वेळ देऊ शकतो परंतु मुलांसाठी वेळ देऊ शकत नसाल तर सर्व काही व्यर्थ आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली त्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे व दाखले दिले.

प्रत्येक वेळी शाळेला किंवा शिक्षकांना दोषी धरण्यापूर्वी आपण आपला मुलगा खरं बोलतो की खोटे बोलतो हे पुन्हा तपासून पहावे, कारण ही एकतर्फी प्रक्रिया नाही असेही स्पष्ट केले.आपल्या मुलांना परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून आपण मुलांवर रागावतो चिडतो असे न करता आपण त्याला प्रेरणा द्या.

त्यासाठी त्यांनी थॉमस एडिसन यांचे उदाहरण दिले. त्यांच्या आईने जर त्यांना त्यावेळी प्रोत्साहन दिले नसते ते संशोधक होऊ शकले असते काय?असा प्रश्न विचारला.त्याने जे गुण प्राप्त केलेले आहे त्यावर समाधान मानून आणखी प्रयत्न करण्यास त्याला प्रवृत्त करा.

आपण मुलांची तुलना करू नका,हा अनमोल सल्ला त्यांनी आपल्या व्याख्यानातून दिला.आपल्या भविष्यामध्ये येणारा काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असल्या कारणाने त्याला सामोरे जाण्याची क्षमता  मुलांमध्ये कशी निर्माण होईल, मुलांना व्यवहार ज्ञान यावे म्हणून  दररोजचे छोटे छोटे व्यवहार करू द्या.

मुलांमध्ये नियमितपणा, सामाजिक बांधिलकी, मदत करण्याची वृत्ती, पुढाकार, सुयोग्य संवाद कौशल्य, सांस्कृतिक वारसा याची जाणीव करून द्या, हे सर्व करत असताना शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतात परंतु विद्यार्थ्यांनी त्याला प्रतिसाद देणे तितकेच महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेणे गरजेचे आहे असे अखेर संभाजी जोंधळे म्हणाले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!