मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक (गट-क) पदासाठी येणारी पुढील भरती पूर्णतः म्हणजे १००% फक्त जवान संवर्गामधून पदोन्नतीद्वारे केली जाणार आहे.
उत्पादन शुल्क विभागातील गुन्हेगारी तपास,छापे,वाहन तपासणी आणि दारूच्या अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे ही दुय्यम निरीक्षकांची प्रमुख जबाबदारी असल्याने, या पदासाठी शारीरिक क्षमतेची आवश्यकता असते.याच पार्श्वभूमीवर लिपिक संवर्गातून पदोन्नती रद्द
करून जवानांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे,अशी घोषणा उपमुख्यमंत्री.अजित पवार यांनी विधानसभेत केली.यापूर्वी या पदासाठी २५% पदे थेट पदोन्नतीने, २५% मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे (ज्यातून फक्त ५% लिपिक संवर्गातून) आणि ५०% नामनिर्देशनाद्वारे भरली जात होती.
आता सेवाप्रवेश नियमात सुधारणा करून पदोन्नतीचे सर्वच पद जवानांमधूनच भरले जातील. सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेबाबत विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेण्यात येणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.जर ती प्रक्रिया थांबवता आली नाही तर ती पूर्ण करून त्यानंतरची सर्व भरती फक्त जवान संवर्गातूनच होईल असेही.उपमुख्यमंत्री अजित यावेळी स्पष्ट केले.